जळगाव : 'बाल हक्क संरक्षण आयोगा'च्या रडावर माजी आमदारांची शाळा

पोलिसांसह प्रशासनाकडून मागविले अहवाल
Child Rights Protection Commission
बाल हक्क संरक्षण आयोग
Published on
Updated on

जळगाव : अमळनेर येथे मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले होते. याप्रकरणी 'नौरोजी बाल हक्क आयोग आपल्या दारी' मधून आज (दि.९) सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी या प्रकरणी ताशेरे ओढले असून प्रशासन व पोलीस यांच्याकडून अहवाल मागविणात आले आहेत. त्यामुळे माजी आमदाराची शाळाही बाल हक्क संरक्षण आयोगाच्या रडावर आलेली आहे.

Child Rights Protection Commission
जळगाव : रस्त्यावर खड्ड्यांची धोक्याची घंटा; प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांनी सुरू केलेल्या 'बाल हक्क आयोग आपल्या दारी' या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन या ठिकाणी जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी आज अनेक प्रकरणांची सुनावणी झाली. यात ४० प्रकरणे होती. यापैकी दहा ते बारा प्रकरणे आयोगाच्या सदस्यांनी तक्रारदार व व दुसरी बाजू ऐकून घेऊन निकाली काढले. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, अॅड. प्रज्ञा खोचरे, चैतन्य पुरंदरे, विधी समन्वय प्रमोद बाडगे, माधवी भोसले, उज्वला आवडे, अजय लोंढे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नखाते हे उपस्थित होते.

Child Rights Protection Commission
जळगाव : ३६ हजारांची लाच घेताना कामगार निरीक्षक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

मंत्र्याच्या स्वागतासाठी माजी आमदार यांच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभा करण्यात आले होते. याप्रकरणी यावेळी सुनावणी घेण्यात आली. या बालहक्क आयोगाच्या सदस्यांनी ताशेरे ओढत पोलीस प्रशासन व प्रशासन यांच्याकडून तात्काळ अहवाल मागवण्यात आल्याचे सांगितले.

Child Rights Protection Commission
जळगाव : वरणगावचे केंद्र रद्द केलेले नाही; पोलीस प्रशिक्षण केंद्र पळविल्याचे केले खंडन

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून 'बालहक्क आपल्या दारी' या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन बालहक्क आयोग आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. तक्रारदाराला मुंबईकडे न येता त्यापेक्षा आयोगच आपल्या दारी या माध्यमातून सर्व तक्रारीवर सुनवाई व कारवाई होत आहे व मुलांना व त्यांच्या हक्कांना संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे माध्यमांशी बोलताना बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर म्हणाल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news