Jalgaon | कोथळी संत मुक्ताई व शिरसाळा हनुमान मंदिरासाठी 6 कोटींचा निधी मंजूर

आ. चंद्रकात पाटील यांचा पाठपुरावा
Temple
Published on
Updated on

जळगाव : मुक्ताईनगर येथील संतमुक्ताई मूळ मंदिर कोथळी व शिरसाळा हनुमान मंदिर या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा असून दोघे मंदिरांसाठी ६ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आ. चद्रकात पाटील यांनी पाठपुरावा केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२४-२५ अंतर्गत विकास महामंडळाशी संबंधित विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय क्रमांक : टीडीएस 2024/06/प्र. क्र.120/पर्यटन-1 हा शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2024 रोजी झालेला आहे.

Temple
Sharad Pawar Meet Eknath Shinde | मराठा आरक्षणाबाबत शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर तालुक्यातील आदिशक्ती श्री संत मुक्ताई मूळ मंदिर कोथळी येथील पर्यटन क्षेत्र विकास करण्यासाठी 5 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिर परिसर पर्यटन क्षेत्र विकास करणे कामी 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत दोघी मंदिरांसाठी एकूण 6 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

आ. चंद्रकांत पाटील यांनी पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी लवकरच निधी मंजूर करण्याचा शब्द दिला होता, विशेष म्हणजे पालखी स्वगृही येण्याच्या आत 5 रुपये कोटी निधी मंजूर करून शब्द पाळला., संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई कोथळी मंदिर व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज तसेच असंख्य वारकरी बांधवांतर्फे आभार मानण्यात येत आहेत.

ही होणार कामे –

१) आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधी स्थळ मूळ मंदिर (कोथळी) मुक्ताईनगर या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संत मुक्ताई जीवन चरित्र भीतीचित्र डिजिटल स्वरूपात साकारणार !

२) भव्य प्रवेशद्वार

३) दोन मजली भक्त निवास व

४) सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news