जळगांव : क्रीडा राज्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच क्रीडा भवनाची दयनीय अवस्था

बॉक्सिंग रिंग फाटलेल्या, तर मॅट व गाद्या भंगार अवस्थेत
Jalgaon Sport Complex Issue
जळगावामध्ये क्रीडा संकुलामध्ये एकीकडे ट्रेडमिल खराब होऊन धुळ खात पडले आहे तर भवनाच्या स्लॅबला भगडाद पडले आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

जळगांव : भारत सरकार ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. तर, दुसरीकडे मात्र चित्र वेगळच दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा भवन मधील भवनाची व क्रीडा साहित्याची झालेली दयनीय अवस्था पाहता खेळाडूंना सरावासाठी कोणते साहित्य मिळत असेल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा विभाग देण्यात आलेला असतानाही जिल्ह्याची क्रीडा भवनाची ही अवस्था आहे. तर तालुक्यातील क्रीडा भवनाची अवस्था काय असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Jalgaon Sport Complex Issue
चंद्रपुरात उभारणार अद्यायावत 'क्रिडा संकुल'

भारत सरकार खेळाडूंवर व खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे मात्र जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत हा विषय लागू व त्यांना दिसत नाही. जळगाव शहरातील जिल्हा क्रीडा भवनात अत्याधुनिक साम्रगी आहे. मात्र सध्या या वस्तू दुर्लक्षित झालेल्या दिसत आहेत. जिम्नॅस्टिक व इतर खेळांमध्ये वापरण्यात येणारे लाखो रुपयाचे मॅट ते एका खोलीमध्ये पडूने आहे. त्या ठिकाणी कबुतरांनी घाण केली आहे. तसेच मॅटवर धुळीचे साम्राज्य जमलेले आहे. अशा परिस्थितीत खेळाडू या मेटवर खेळले तर त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

दुसरीकडे जिल्हा क्रीडा भवनामध्ये करण्यात आलेल्या पीओपीची दुरुस्त झालेली नाही. तर, काही ठिकाणी लाइटिंगचे वायरिंग उघडे झाले आहे. तसेच बाथरूममध्ये घाणीचे साम्राज्य आहे. खेळाडू ज्या ठिकाणी खेळतात किंवा खेळण्यास येतात त्या ठिकाणी स्वच्छता ही केलेली दिसून येत नाही. अशी अवस्था क्रीडा भवनाची झाली आहे. खेळाडूंसाठी वेळ पाहण्यासाठी असलेले घड्याळ सुद्धा वेळेच्या खूप मागे चालत आहे. शालेय विद्यार्थी खेळण्यासाठी जिल्हा क्रीडा भवनामध्ये येतात तेव्हा तेथे असलेले रक्षक त्यांना सरावासाठी असलेल्या वस्तूंना वापरू देत नाहीत. मग जिल्हा क्रीडा भवनामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त मॅच पुरतच यायचं का त्यांनी मॅच पूर्वीचा सराव करायचा कुठेही प्रश्न उपस्थित होते

Jalgaon Sport Complex Issue
’सहकार संकुल’च्या उभारणीचा मुहूर्त लवकरच; आचारसंहिता संपल्यानंतर शासनस्तरावरून निश्चिती

ज्या बॉक्सिंग रिंग मध्ये सामने झाले ते बॉक्सिंग मधील टाकण्यात आलेले कापडच फाटले होते. यातचच बॉक्सिंगचे मॅचेस पार पडल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेला रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा विभाग देण्यात आलेला आहे त्यांच्या जिल्ह्यात जिल्हा क्रीडा भवनाचे व्यवस्था झालेली आहे तसेच तालुक्याचे जे क्रीडा भवन आहे त्यांच्यामध्ये आजपर्यंत कुठे मॅचेस मुलांनी सराव केला आहे की नाही. अनेक ठिकाणी पेढा होणे हस्तांतरित झालेले नाही किंवा त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. या सर्व प्रश्नांबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news