

जळगाव: बोगस कॉल सेंटर प्रकरणात मुंबईतील एका आरोपीला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान असे संशयित आरोपीचे नाव आहे. उपविभागीय अधिकारी गणापुरे यांनी सांगितले की, या आरोपीचा कॉल सेंटर उभारणीमध्ये मुख्य हात होता.
मुंबईतील इम्रान या संशयिताला न्यायालयात हजर केले असता, सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन मुख्य मुंबईतील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
जळगाव येथील मुमराबाद रोडवरील एल के फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकून बोगस कॉल सेंटर उघड केले होते. या प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे.
इम्रान जून महिन्यापासून जळगाव येथे वास्तव्य करीत होता. कॉल सेंटर उभारणीमध्ये त्याने रंग रोगोटी व इतर कामे केली असून, त्याला दोन महिन्यांसाठी ८० हजार रुपये पगार देण्यात आला होता, असे सूत्रांकडून मिळालेले आहे.
पोलिसांचा आरोप आहे की, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना पकडल्यानंतर या प्रकरणात अधिक आरोपींचा उघड होण्याची शक्यता आहे.