पिंपळनेर-ताहराबाद रस्ता पाच महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुला

मौसम नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाच्या दुरुस्तीसाठी होता बंद
Pimpalner-Tahrabad road opened for traffic after five months
पिंपळनेर-ताहराबाद रस्ता पाच महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुलाFile Photo
Published on
Updated on

पिंपळनेर,जि.धुळे पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर - ताहराबाद रस्ता हा मोसम नदीवरील पुलाच्या दुरुस्तीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद होता. पुलाच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर हा रस्ता काल (शनिवार) ता.21 पासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्‍यामुळे नाशिककडे जाण्यासाठी प्रवाशांना आता सोयीचे होणार आहे.

ताहराबादजवळ असलेल्या मौसम नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाला तडे पडल्यामुळे पुलाच्या दुरुस्तीसाठी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे पिंपळनेरहून ताहराबादकडे जाणारी वाहतूक नामपूरमार्गे सुरू होती. यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस व खासगी वाहनांना दुपटीचा फेरा पडत होता. या फेऱ्यामुळे एसटीसह खासगी वाहनधारकांनी दुपटीचे भाडे आकारणे सुरू केले होते. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता.

तसेच या पुलाच्या कामामुळे नंदुरबार, नवापूर, साक्रीकडून नाशिककडे जाणाऱ्या एसटी बसेसदेखील बंद झाल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर होण्यासाठी काही सामाजिक संघटनांतर्फे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केले. त्यानंतर काल ता.21 शनिवारपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या मार्गावरील बसदेखील सुरू झाल्या आहेत.

प्रवाशांना मिळाला दिलासा

पाच महिन्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनधारकांचा नामपूरमार्गे जाण्याचा फेरा वाचला असून, दुसरीकडे प्रवाशांनाही जादा भाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच यामुळे प्रवाशांचा वेळही वाचला आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर काल (शनिवार) दिवसभर सोशल मीडियावर या पुलाच्या वाहतुकीची खमंग चर्चा होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news