Dhule News | कान नदीच्या पुरात महिला गेली वाहून

तीन जण बचावले
Kan river woman was washed
कान नदी पुरात महिला गेली वाहून pudhari photo
Published on
Updated on

पिंपळनेर : अष्टाणे (ता. साक्री., जि. धुळे) येथे कान नदी पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रवाहाने चार जण वाहून जात असताना तीन जण बचावले, तर महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाले, प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यातील मालनगाव प्रकल्पातूनही कान नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. मंगळवारी (दि. 27) सकाळी अष्टाणे-विजयपूर शिवारातील पुलावरून नदी पार करत असताना सीताराम काशिराम सुळ, गोझरबाई सीताराम सुळ, देवा काळू वयकर आणि ओझरबाई देवा वयकर हे चार जण वाहून जात होते. यावेळी तीन जण बचावले तर ओझरबाई देवा वयकर या वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आपत्ती दलास माहिती दिली. त्यानंतर आपत्ती पथकाने मदतकार्य सुरू केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news