धुळे काँग्रेस भवनात माजी आमदार, जिल्हा बँक संचालकामध्ये हमरीतुमरी

Dhule Congress | साक्री तालुक्यातील गटबाजी उफाळली
Dhule Congress clash
धुळ्यात काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये साक्री तालुक्यातील गटबाजी उफाळून आली. Pudhari Photo
Published on
Updated on

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये साक्री तालुक्यातील गटबाजी अचानक उफाळून आली. साक्री तालुक्याचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे संचालक दोघेही हमरी तुमरीवर आले. बैठकीतील इतरांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला. राष्ट्रीय सचिव तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख काजी मोहम्मद निजामुद्दीन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे त्यांनी देखील मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

धुळे येथील काँग्रेस भवनात आज महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तराखंड राज्यातील विधानसभा सदस्य काझी मो. निझामुद्दीन यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीस काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, माजी नगरसेवक साबीर शेख, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी प्रतिभाताई शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष भा .ई. नगराळे, युवराज करनकाळ, पितांबर महाले, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करण्यासाठी माजी आमदार डी. एस .अहिरे हे उभे राहिले .यावेळी त्यांनी साक्री तालुक्यातील काँग्रेसमधील गटबाजीचा विषय मांडला. प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात काम केले जात असल्याची बाब त्यांनी उघडपणे बोलून दाखवली. त्यांचे मार्गदर्शन सुरू असतानाच जिल्हा बँकेचे संचालक दर्यावगीर महंत यांनी त्यावर तीव्र शब्दांत हरकत नोंदवली. त्यामुळे या दोघांमधील वाद वाढला. हा वाद अचानक हमरी तुमरी आणि एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत आला. त्यामुळे प्रत्यक्ष समन्वयक निजामुद्दीन यांना देखील मध्यस्थी करावी लागली.

अखेर माजी नगरसेवक साबीर शेख, तसेच श्याम सनेर यांनी या दोघांनाही समजावले. त्यामुळे हा वाद थांबला. अखेर मार्गदर्शन करत असताना समन्वयक निजामुद्दीन यांनी आपण पक्षाचे काम करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाची समस्या ऐकण्यास तयार आहोत. मात्र, अशा पद्धतीने मत प्रदर्शन करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेस भवनात झालेल्या या राड्याची दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.

Dhule Congress clash
धुळे : शिरपूरमध्ये गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; मिळून आलेली शेती वनविभागाची?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news