जागतिक मल्लखांब दिन विशेष | नाशिक होतेय मल्लखांब नगरी

जागतिक मल्लखांब दिन विशेष | नाशिक होतेय मल्लखांब नगरी
Published on
Updated on

[author title="नाशिक : निल कुलकर्णी" image="http://"][/author]

मल्लखांब हा क्रीडा प्रकार शिकण्याकडे नव्या पिढीतील युवक-युवतींचा कल गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. नाशिकमध्येच या खेळाची सुरुवात पेशवेकाळात झाली. तिथेच हा क्रीडा प्रकार बहरत असल्याचे आश्वासक चित्र आहे.

मल्लखांब खेळाची मुहूर्तमेढ नाशिकमध्ये रोवली गेली. कोठुरे यागावचे बाळंभट्ट जनार्दनभट्ट देवधर यांना मल्लखांब खेळाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी वणी या गावी २०० वर्षापूर्वी पेशवेकाळात मल्लखांबला प्रथम सुरुवात केली. गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये मल्लखांबाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर झाल्याने नाशिक मल्लखांबाची क्रीडा प्रकाराची नगरी म्हणून उदयास येत आहे. आज शहरात ३०० हून अधिक मल्लखांब पटू या खेळात नैपुण्य मिळवत आहेत.आज या खेळाची वैभवी परंपरा बहरत आहे.

१०० वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या यशवंत व्यायामशाळेत मल्लखांब पट्टू तयार होतात. येथे रोप मल्लखांब आणि पारंपरिक रोवलेला मल्लखांबचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रकारात लवचिक शरीर, योग यांचा समावेश असल्याने हा चपळाईचा तसेच अत्यंत जलद हालचालींचा, एकाग्रतेचा क्रीडा प्रकार म्हणन सर्वच खेळांसाठी साहायभूत ठरतो.

विशेष म्हणजे नॅशनल असो. फॉर ब्लाईंड संस्थेच्या अंध मुली मल्लखांब खेळात उतरल्या असून त्यात प्राविण्य मिळवत आहेत. शहरात काही खाजगी शाळांमध्ये मल्लखांबचे प्रशिक्षण दिले जाते. नाशिकमध्ये छोट्या वयोगटातील मास्टर खेळाडू तयार होत असून तेही उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. २४ देशात मल्लखांब सूरु आहे. कोठुरे यागावी बाळंभट्ट जनार्दनभट्ट देवधर १७८० जन्म झाला इथूनच या खेळाला जगभरात प्रारंभ झाला.पुरुषांचाच क्रीडा प्रकार म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्रकारात आज मुलीही मल्लखांब स्पर्धेत भाग घेत आहेत. दोरीवरचा मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या मुलीं यश मिळवत आहे. २०२३ प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदा मल्लखांबचा समावेश झाला. 'खेलो इंडीया' मध्येही हा क्रीडा प्रकार समाविष्ट करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये मल्लखांब क्रीडापटू मोठ्या प्रमाणावर घडत आहे. जगात प्रथमच अंध मुलींनीही या प्रकारात नैपुण्य प्राप्त करत असून नाशिकचे नाव मोठे करत आहेत. चपळता, गती, एकाग्रता यांचा समावेश असलेल्या या क्रीडा प्रकारात, योग, व्यायामप्रकार आदींचा समावेश असल्याने हा सर्वांगसुंदर संपूर्ण क्रीडा प्रकार ठरतो. अनेक खेळांसाठी अत्यंत पुरक, साहायक क्रीडा प्रकार म्हणूनही याकडे पाहीले जाते. महापालिकेतील शाळांमध्येही मल्लखांब सुरु व्हावेत अशी अपेक्षा.!

– यशवंत जाधव, प्रशिक्षक, मल्लखांब, यशवंत व्यायाम प्रकार

हेही वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news