PM Narendra Modi | नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना कॉंग्रेसमध्ये विलीन होणार : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi | नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना कॉंग्रेसमध्ये विलीन होणार : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क ; नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये विलीन होणे निश्चित आहे. नकली शिवसेना अस्तित्वातच राहणार नाही. नकली शिवसेना जेव्हा कॉंग्रेसमध्ये विलीन होईल. तेव्हा मला पहिली आठवण बाळासाहेब ठाकरे यांची होईल. कारण, ज्या दिवशी शिवसेनेला कॉंग्रेससोबत जावे लागेल तेव्हा मी पक्षाचे काम बंद करेल असे बाळासाहेबच म्हणाले होते अशी आठवण मोदींनी करुन दिली.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे (दि. 15) सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी व शिवसेना पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. विकसीत भारतासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो असल्याचे मोदी म्हणाले.

कॉंग्रेसवर जोरदार टीका

  • कॉंग्रेस अगदी वाईट पद्दतीने हरणार आहे.
  • कॉंग्रेस विरोधी पक्ष बनणं हे सुद्धा अवघड
  • कॉंग्रेसकडून धार्मिक ध्रुवीकरण सुरु
  • देशाच्या बजेटचे 15 टक्के मुस्लीम समाजावर खर्च व्हावेत अशी कॉंग्रेसची इच्छा
  • आआधीही सत्तेत असताना कॉंग्रेसने तेच केलं.
  • कॉंग्रेस संपत्ती जप्त करुन मुस्लिमांना देण्याच्या तयारीत

कांदा निर्यातीवर काय म्हणाले?

  • 10 दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी हटवली आहे.
  • 10 दिवसात 22 हजार मेट्रीक टन पेक्षा अधिक कांद्याची निर्यात झाली.
  • 10 वर्षात कांद्याची निर्यात 35 टक्क्यांनी वाढवली.
  • 60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही खरेदी केला.
  • आता 5 लाख मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत.
  • निर्यातीसाठी आम्ही अनुदान देखील दिले आहे.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news