नाशिक : नांदुर नाका लिंक रोड येथील समृद्धी बॅक्वेंट हॉलमधून चोरट्याने एक लाख ७७ हजार ५०० रुपयांचा कॅमेरामनचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी तपास करीत संशयित रोहित झगडे (२१, रा. भोये गल्ली, सिन्नर) यास पकडले आहे. तेजस शिंदे (३१, रा. पालखेड रोड, दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार, २ फेब्रुवारीला चोरट्याने कॅमेरा लेन्स, बॅग, मेमरी कार्ड, बॅटरी व इतर किमती ऐवज लंपास केला होता. त्यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काठे गल्ली परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने सात लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ईशा वोरा (रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी (दि. ८) सायंकाळी काठे गल्ली परिसरात गेल्या असता चोरट्याने पर्समधून दागिने लंपास केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीच्या हँडलला अडकवलेल्या बॅगेतून चोरट्याने लॅपटॉप चोरून नेल्याची घटना जेलरोड येथील व्यापारी बँकेजवळ घडली. तुषार शिंदे (३८, रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने १० फेब्रुवारीला ६० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा :