Nashik News | ओतूर प्रकल्पाला 65 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता

कळवण : ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानताना आमदार नितीन पवार.
कळवण : ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानताना आमदार नितीन पवार.
Published on
Updated on

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाला आपण निधी देणार अन प्रश्न मार्गी लावणार, हा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार नितीन पवारांसमवेत शिष्टमंडळातील शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात दिला होता. तो शब्द आज खरा करून दाखवताना प्रकल्पाच्या कामासाठी पवार यांनी 65 कोटी 33 लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. शिष्टमंडळातील सहभागी शेतकऱ्यांनी शिरसमणीमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली.

मंत्रालयात सकाळी 10 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी व्यय अग्रक्रम समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जलसंपदा विभागाकडील ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती कामासाठी 65 कोटी 33 लाख रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याबाबतची माहिती आमदार नितीन पवार यांनी शेतकऱ्यांना दिल्याचे वृत्त ओतूर परिसरात धडकताच शेतकऱ्यांनी शिरसमणी येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, युवा नेते हृषिकेश पवार, बाजार समितीचे संचालक सुधाकर खैरनार यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. ओतूर परिसरातील गेल्या 45 वर्षांपासून प्रलंबित ओतूर प्रकल्पाचा प्रश्न सोडविण्यात आमदार नितीन पवार यांचे प्रयत्न यशस्वी झाल्याबद्दल व प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात आले.
चौकट

२०१४ पासून कामकाज बंद
ओतूर धरणाचे काम 1977 ला पूर्ण झाले. प्रकल्पात पाणीसाठा झाल्यापासूनच गळती सुरू आहे. 2012 मध्ये गळती प्रतिबंधक उपायांसाठी स्व. ए. टी. पवार यांनी सात कोटींचा निधी मिळविल्यामुळे 2013 मध्ये धरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मालेगाव पाटबंधारे विभागाने अपूर्ण तरतूद केल्यामुळे 2014 पासून पुन्हा काम बंद पडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्च 2022 च्या अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद करून कामाला चालना दिली होती.

ओतूर प्रकल्पाचे स्व. ए. टी. पवारांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे असल्यामुळे याप्रश्नी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओतूर प्रकल्पाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे याचा मनस्वी आनंद आहे. -आमदार नितीन पवार, कळवण.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news