इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- मुंबई नाशिक महामार्गावरील इगतपुरी जवळील साई कुटीर येथे चालत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या निसान बिट कारने अचानक पेट घेतला.
आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी तातडीने रस्त्याच्या बाजूला उभी करून उडी मारली. यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र घोटी, इगतपुरी नगरपरिषद अग्निशमन दल, टोल नाका अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम सुरू करून आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पिंपरी फाट्यावरून वळवण्यात आली होती.
हेही वाचा :