गिरीश महाजन
गिरीश महाजन

Nashik News : भाजप ओबीसी मोर्चाची आज विभागीय बैठक

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा-विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिकची सूत्रे पुन्हा एकदा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी नाशिक दौरा आणि सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची जबाबदारी महाजनांकडे सोपवितानाच भाजपच्या ओबीसी मोर्चाची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकही बुधवारी (दि.३) मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.

सातपूर येथील हॉटेल अयोध्या येथे दुपारी ३ वाजता ही बैठक होणार आहे. ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ग्रामीण अध्यक्ष शंकर वाघ, सुनील बच्छाव, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, विजय साने, बाळासाहेब सानप, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस गुरुदेव कांदे, दीपक पवार, बापू घडामोडे, विनोद दळवी, मनोज ब्राह्मणकर, सुषमा चौधरी – गोराणे, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक भरत महाजन, ओबीसी मोर्चा प्रदेश युवक संपर्कप्रमुख मच्छिंद्र सानप, प्रदेश महिला संपर्कप्रमुख उज्ज्वला हाके या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबीसी मोर्चा महानगराध्यक्ष अजय आघाव यांनी दिली.

आगामी निवडणुका, पंतप्रधान मोदी यांचा नाशिक दौरा व सध्या मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी घेतलेली भूमिका व त्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका त्यामुळे भाजपच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news