Saptshrungigad Vani : सप्तश्रृंगीगडाच्या विकासासाठी 45 कोटींचा आराखडा 

Saptshrungigad Vani : सप्तश्रृंगीगडाच्या विकासासाठी 45 कोटींचा आराखडा 
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ असलेल्या सप्तश्रृंगगडाच्या (Saptshrungigad Vani)  सर्वांगिण विकासासाठी ४५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गडावरील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या निधीतून (एसडीआरएफ) करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने घेतला आहे.

राज्य शासनाने सप्तश्रृंगगडाचा (Saptshrungigad Vani)  'ब' वर्गात समावेश करताना तेथे विविध विकासकामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नांमधून गडाच्या सर्वांगीण विकासासाठी ४५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने राज्याच्या मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी शुक्रवारी (दि.१७) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आराखड्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित होते.

सप्तश्रृंगगडावर (Saptshrungigad Vani)  राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचे नियोजन व प्रस्तावांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या निधीतून ३५ कोटींची कामे करण्यास मान्यता दिली. तसेच उर्वरित १० कोटींची कामे ही संबंधित विभागांकडील निधीतून हाती घेण्याचा निर्णय यावेळी झाला. त्या कामांमध्ये हायमास्ट विद्युत दिवे उभारणे, मंदिराच्या आवारात यात्रेकरूंसाठी इमारतींची उभारणी तसेच एसटी महामंडळाचे बस टर्मिनल बांधण्यासह पोलिस स्टेशनचा यात समावेश असेल. त्यामुळे भविष्यामध्ये गडाचा चेहरामोहरा पालटणार आहे.

३५ कोटींतील कामे

एसडीआरएफच्या निधीतून सप्तशृंगगड-नांदुरी मार्गावरील भूस्खलन रोखण्यासाठी 35 कोटी रुपयांचा निधीचा समावेश आहे. याशिवाय मंदिराच्या तीर्थक्षेत्रावरील खडक पडण्याच्या संरक्षण यंत्रणेच्या देखभालीसाठी 1.92 कोटी रुपये मंजूर केले. मंदिरावर दगड पडू नयेत म्हणून मंदिराच्या वरच्या बाजूला मॅकाफेरी रॉकफॉल प्रोटेक्शन सिस्टीम बसवली आहे. ही दोन्ही कामे एसडीआरएफने दिलेल्या निधीतून केली जाणार असल्याचे समजते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news