File Photo
File Photo

जळगाव : रोहिणी गावात दोन लाख 35 हजारांची घरफोडी

Published on

जळगांव: चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावात अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करून 2 लाख 35 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे राहणारे वाल्मीक वसंत दिघोळे यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी घराच्या कंपाऊंडच्या गेटचे कुलूप तोडून घराच्या सेफ्टी गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एक लाख 65 हजार रुपये रोख तर 70 हजार सहाशे रुपये सोने चांदीचे दागिने असे दोन लाख 35 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news