नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे. होर्डिंग्जवर गुन्हेगाराचे फोटो टाकू नये व रस्त्याला अडथळा येणार नाही, याचे नियोजन गणेश मंडळांनी केले पाहिजे, असे आवाहन पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी केले.
आगामी गणेशोत्सवानिमित्त अंबड पोलिस ठाणेच्या वतीने गणेशचौक येथील महेश भवन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत उपआयुक्त मोनिका राऊत बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, अंबड चुंचाळे पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक अंबड पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी मंडळासाठी परवानगी कशी घ्यायची, याची माहिती दिली. तसेच बैठकीत उपस्थित गणेश मंडळ तसेच शांतता समिती सदस्य माजी नगरसेविका प्रतिभा पवार, संजय भामरे, प्रशांत जाधव, उत्तम काळे, समाधान ठोके, अर्जुन वेताळ, कैलास मोरे, तुषार सोळंके आदींनी सर्व गणेश मंडळांनी सर्व प्रकारच्या परवानग्या घेत कायदा-सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागणार नाही, असे आवाहन केले. आमदार सीमा हिरे यांनीही मार्गदर्शन केले. शांतता समितीच्या बैठकीला मनपा व विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा :