नाशिक : महाकाल मंदिर सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर बाणेश्वराला दुग्धाभिषेक | पुढारी

नाशिक : महाकाल मंदिर सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर बाणेश्वराला दुग्धाभिषेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे महाकाल मंदिराचे सुशोभीकरण करून लोकार्पण सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना भारतीय जनता पार्टी तपोवन मंडलाच्या वतीने पंचवटीतील बाणेश्वर महादेव मंदिर येथे दुग्धाभिषेक व पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी एलईडी स्क्रीनद्वारे उज्जैन येथील लाइव्ह कार्यक्रम नागरिकांना दाखविण्यात आला. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मुख्यालय प्रभारी तथा विभागीय संघटनमंत्री रवि अनासपुरे, आ. देवयानी फरांदे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सुनील केदार, अमित घुगे, नाना शिलेदार, उत्तम उगले, दिगंबर धुमाळ, प्रवीण भाटे, महेश महांकाळे, सतनाम राजपूत, वैभव क्षेमकल्याणी, धनंजय पुजारी, राहुल कुलकर्णी, पूनम ठाकूर, भारती माळी, मंजूषा लोहगावकर, सुरेश खेताडे, रुची कुंभारकर, शिवम शिंपी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button