भुसावळ येथे झालेल्या अपघातात आजीसह नातीचा मृत्यू | पुढारी

भुसावळ येथे झालेल्या अपघातात आजीसह नातीचा मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगडकडून कल्याणकडे भरधाव वेगाने निघालेल्या इंडिगो वाहनाचा भुसावळ येथील खडका चौफुलीवर अचानक टायर फुटला. यामुळे हे वाहन उभ्या असलेल्या टँकरवर धडकून झालेल्या भीषण अपघातात 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर दीड वर्षाची मुलगी ठार झाली आहे. त्याचबरोबर एक दाम्पत्य या अपघातात गंभीर जखमी झाले.

हा अपघात रविवार, 2 जानेवारी रोजी  झाला. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, अपघातात इंडिगो वाहन चक्काचूर झाले आहे. रस्त्यावर उभ्या बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या वाहनांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होण्याची अपेक्षा वाहनधारकांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथून इंडिगो गाडी क्रमांक सी.जी.डी.एफ.5047 ही कल्याणकडे निघाली होती. भुसावळ येथील  खडका चौफुली आल्यानंतर अचानक वाहनाचे मागील बाजूचे टायर फुटले. इंडिगो गाडी  उभ्या टँकरवर आदळली. या अपघातात वाहन चालक दीपकसिंग आलुवालिया (33, रायपूर, छत्तीसगढ), गुंजन आलुवालिया (30) हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर डॉ. उल्हास पतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  त्यांच्या आई सुरेंदर कौर (62, रायपूर, छत्तीसगढ) यांचा जागीच  मृत्यू झाला. उपचाराला नेत असताना दीपकसिंग यांची मुलगी बानी आलुवालिया (वय 2) हिचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नगारिकांसह पोलिसांनी तातडीने जखमींना गोदावरी रुग्णलयात  उपचारासाठी हलवले. दरम्यान, आजी व नातीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचलत का?

Back to top button