धुळे : परदेशातून आलेल्या महिला डॉक्टरसह मुलाला ‘डेल्टा’ची बाधा | पुढारी

धुळे : परदेशातून आलेल्या महिला डॉक्टरसह मुलाला 'डेल्टा'ची बाधा

धुळे, पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरात परदेशातून आलेल्या महिला डॉक्टरसह तिच्या मुलाला काेराेनाच्‍या  डेल्टा व्हेरीयंटची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. धुळ्यात ओमायक्रॉनचे रूग्ण नसले तरीही प्रशासनाकडून परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करत खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, या दोघा डेल्टा बाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. विदेशातून  एका महिला डॉक्टरची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. सर्वप्रथम विमानतळावर घेण्यात आलेल्या स्वॅबच्या अहवालात या महिलेला कोरोना झाला नसल्याचा अहवाल आला. त्यानंतर धुळे जिल्ह्यात आल्यावरही तिची कोरोना तपासणी केली. त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला. मात्र काही दिवसानंतर एका खासगी लॅबमध्ये ही तपासणी केली असता, या महिला डॉक्टर व तिच्या मुलाला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

या दोघांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या परिवारातील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने, ओमायक्रॉनची तपासणी करण्यासाठी त्यांचे स्वॅब पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या तपासणीचा अहवाल धुळे आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यांना ओमायक्रॉन नसून डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button