धुळे : पिंपळनेरच्या अंकुश पाठक याची भारताच्या हॉलिबॉल संघात उपकर्णधारपदी निवड | पुढारी

धुळे : पिंपळनेरच्या अंकुश पाठक याची भारताच्या हॉलिबॉल संघात उपकर्णधारपदी निवड

पिंपळनेर : अंबादास बेनुस्कर

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका येथील पिंपळनेरचा पुत्र अंकुश पाठक याची दुबई येथे होणाऱ्या हॉलिबॉल वर्ल्ड चॅंपियनशिप स्पर्धेसाठी  उपकर्णधारपदी निवड झाली आहे. पिंपळनेर येथील कर्म. आ. मा. पाटील विद्यालयात शिकत घेत असताना इयत्ता सातवी पासून अंकुशला हॉलिबॉल या खेळाची आवड निर्माण झाली. तेव्हापासून अंकुश हॉलिबॉल खेळाच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. २०१३ साली अंकुशने पहिल्यांदा तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय हॉलिबॉल स्पर्धा खेळला. त्यानंतर २०१७साली हॉलिबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर निवड होऊन अंकुशचा संघ विजेता देखील झाला होता.

अंकुशने सुरूवातीपासून कसून सराव, सातत्य, जिद्द व चिकाटी यांच्या आधारे  राज्यस्तरावर तब्बल सहा वेळेस विजेतेपद पटकावले आहे. २१ डिसेंबर ते १ जानेवारी २०२२ दरम्यान दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅंपियनशिपमध्ये  २१ डिसेंबर रोजी पहिला सामना भारत विरुद्ध कॅनडा असून हा सामना, भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता खेळवला जाणार आहे.

या वर्ल्ड चॅंपियनशिपमध्ये १९ देश सहभागी होणार आहेत. भारतीय हॉलिबॉल संघाचा कर्णधार विपिन चहल व उपकर्णधार अंकुश पाठक हे २ अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. ही बाब आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारत देशासाठी अत्यंत कौतुकास्पद आहे.  ग्रामीण भागातील सर्वसाधारण खेळाडू देखील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकतो हे अंकुशने सिद्ध करून दाखवले आहे.

२०१८ मध्ये अंकुशने पिंपळनेर येथे व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते, या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातील अनेक संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत सुद्धा अंकुशचाच संघ विजेता ठरला होता, त्याचप्रकारे या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन अंकुशने केले होते.

खेल गौरव पुरस्काराने गौरव

मार्च २०२१ मध्ये अंकुश खेल गौरव पुरस्काराचा मानकरी ठरला  होता. २३ मार्च २०११ रोजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते अंकुशला खेल गौरव पुरस्कार मिळाला. अंकुशला पिंपळनेर येथील कर्म. आ.मा. पाटील विद्यालयातील शिक्षकांचे लाभले. मार्गदर्शन या विद्यालयातील क्रीडाशिक्षक एच. के. चौरे, डी. झेड.पाटील, डी. एस. वंजारी, व्ही. ए. दहिते, डी. बी.साळुंखे व बी. जी. देसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच प्रमाणे पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी, पिंपळनेर या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सुरेंद्र मराठे, धनराज जैन,ए. एस. बिरारीस, सुभाष जैन, एच आर गांगुर्डे , डॉ.विवेकानंद शिंदे (अध्यक्ष, शालेय समिती) व विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य ए. बी. मराठे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. अंकुशने अत्यंत कमी वयात घेतलेल्या गगनभरारीचे पिंपळनेरसह आसपासच्या परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा या क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button