जळगाव : मेडिकल व्यवसायिकाची लाखाची ऑनलाईन फसवणूक | पुढारी

जळगाव : मेडिकल व्यवसायिकाची लाखाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :  शहरातील रिंगरोडवर राहणाऱ्या मेडिकल व्यवसायिकाची १ लाख ४० हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रसन्न नरेंद्र जैन (वय ३५, रा. चंद्रप्रभा कॉलनी, रिंगरोड) हे मेडिकल साहित्य खरेदी- विक्री करण्याचा व्यवसाय करतात. ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी २.३० वाजता आणि १४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता. त्‍याने  आपल्याला सिरीन अर्थात इंजेक्शन पुरण्याचे काम आपण करू शकतो असे सांगितले. त्यानंतर प्रसन्न जैन यांच्या विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक केली.

आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रसन्न जैन यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी जैन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करत आहे.

हेही वाचलं का?

Back to top button