कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून तरुणाची साडेआठ लाखांची फसवणूक | पुढारी

कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून तरुणाची साडेआठ लाखांची फसवणूक

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील एका तरुणाला कर्ज मंजूर करण्यासाठी विविध प्रकारे ऑनलाईन पद्धतीने सुमारे ८ लाख ३४ हजार रुपयांचा गंडा घालण्‍यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे गजानन लक्ष्मण सोनवणे (वय-३७)  हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो. २७ सप्टेंबर रोजी त्याला फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचा बनावट कॉल आला. (Online Fraud)

त्यानंतर त्या प्रतिनिधीने सोनवणे यांना, बजाज फायनान्स कडून ५ लाख रुपयांचे पर्सनल लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. व त्यासाठी विविध प्रकारे त्यांच्याकडून ८ लाख ३४ हजार ८१७ रूपये ऑनलाईन पध्दतीने स्विकारले. पैसे मिळाल्यानंतर अज्ञान व्यक्तीने बजाज फायनान्सचे लोन मंजूर झाल्याचे बनावट लेटर सोनवणे यांना पाठवले.

त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच, सोनवणे यांनी ८ डिसेंबर रोजी, जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button