JDCC Bank : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे - पुढारी

JDCC Bank : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (JDCC Bank) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीने ठरवल्याप्रमाणे अध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात पडली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची वर्णी लागली आहे

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक (JDCC Bank) नुकतीच पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने वीस जागांवर विजय मिळवला. यात 11 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे वर्चस्व आधीच प्रस्थापित झाले होते.

त्यानंतर महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वर्ष तर शिवसेनेला दोन वर्षे अध्यक्ष पद मिळणार असून उपाध्यक्षपदी शिवसेनेला दोन, काँग्रेसला दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक वर्ष अशी संधी मिळणार आहे.

आज जिल्हा बँकेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साठी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना संधी देण्यात आली तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे यांना संधी देण्यात आली.

जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ही शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांसाठीच काम करेल

गुलाबराव पाटील, नूतन अध्यक्ष, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक

हेही वाचा

Back to top button