जळगाव : च्युईंगम श्वसननलिकेत अडकून विद्यार्थ्याचा मृत्‍यू | पुढारी

जळगाव : च्युईंगम श्वसननलिकेत अडकून विद्यार्थ्याचा मृत्‍यू

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा

भडगाव येथील इयत्ता ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्याचा च्युईंगम श्वसननलिकेत अडकून मृत्‍यू झाल्‍याची धक्‍कादायक घटना घडली. ही घटना गुरूवारी दुपारी घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, भडगाव येथे शिक्षण घेत असलेला इयत्ता ९ वी च्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी दुपारी शाळा सुटल्‍यानंतर घरी निघाला होता. या दरम्‍यान च्युईंगम खात असताना च्युईगम त्याच्या श्वासनलिकेत चिकटले. यामुळे श्वास गुदमरून त्‍याचा दुर्देवी मृत्यू झाला.

भडगाव तालुक्यातील पाढरद येथील (15 वर्षीय) उमेश गणेश पाटील हा विद्यार्थी भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर या शाळेत शिकत होता. गुरुवारी दुपारी शाळा 3.30 वाजण्या सुटल्यानंतर त्याने दुकानातून च्युईंगम घेतली. गावी जाण्यासाठी रिक्षात बसला. हे च्युईंगम खात असताना हे त्याच्या श्वासनलिकेत अडकले. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला भडगाव येथे खाजगी दवाखान्यात आणण्यात आले.  डॉक्टरांनी त्याला पाचोरा येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याला पाचोरा येथे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालविली.

गुरुवारी त्याचा गणिताचा पेपर होता. त्याने परीक्षा दिली. दुपारी च्युइंगम चघळत असतानाच हा प्रकार घडल्याचे शाळेच्या सूत्रांनी  सांगितले. उमेश याचे वडील गणेश पाटील हे शेतकरी आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button