जळगाव : अर्भक आढळले कचरा कोंडाळ्यावर मृतावस्थेत - पुढारी

जळगाव : अर्भक आढळले कचरा कोंडाळ्यावर मृतावस्थेत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील  राजीव गांधीनगरात अंदाजे २० ते २२ महिन्याचे अर्भक उकिरड्यावर मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज (दि. ३०) सकाळी राजीव गांधीनगरात २० ते २२ आठवड्याचे अर्भक स्वप्नील चौधरी यांना उकिरड्यावर मृतावस्थेत टाकून दिले असल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती.

स्वप्नील चौधरी यानी घटनेची माहिती पोलिसांना दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. नितेश बच्छाव, हरिश डोईफोडे, सुशिल चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन या बाळाला ताब्यात घेतले आणि पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. तेथे सीएमओ डॉ संदीप पाटील यांनी या बाळाला मयत घोषित केले.

शासकीय रुग्णालयात रामानंद नगर येथिल उपनिरीक्षक शांताराम पाटील यांनी भेट दिली व रामानंदनगर पोलिस स्टेशनला स्वप्निल चौधरी याच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पोलिस या बाळाच्या आईचा शोध घेत आहेत.

Back to top button