भुसावळ मध्ये पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

भुसावळ मध्ये पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिराजवळ गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या हेतूने निखिल राजपूत व त्याच्या टोळीतील साथीदारांनी पोलीस उपनिरीक्षक (प्रभारी) महेश घायतड यांच्यावर हल्ला केला. यावेळी घायतड यांचा गळादाबून त्यांना मारहाण करुन शिवीगाळ करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने निखिल राजपूत सह सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी मध्यरात्री अर्थात शनिवारी (दि २७) रोजी रात्री १२ वाजून ३० वाजणेच्या सुमारास श्रीराम नगर परिसरातील असलेल्या हनुमान मंदिराजवळ निखिल राजपूत, अक्षय न्हावकर उर्फे थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, निलेश ठाकूर तसेच आणखी एका अज्ञात व्यक्तीने महेश घायतड यांच्यावर हल्ला केला. इतक्या रात्री फक्त गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या हेतूने संगनमत करून फिर्यादिस जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचा गळा दाबून मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणला.

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

Back to top button