धुळे- नंदुरबार विधान परिषद : भाजपचे अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड | पुढारी

धुळे- नंदुरबार विधान परिषद : भाजपचे अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे- नंदुरबार विधान परिषद जागेवर आमदार अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांच्यासह अन्य चौघांनी माघार घेतल्यामुळे ही बिनविरोध निवड झाली.

धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आमदार अमरिश पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीने तळोदाचे नगरसेवक गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती. या बरोबरच काँग्रेसकडून शामकांत सनेर तसेच शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेससह भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यात येईल असे संकेत देण्यात येत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगून या बिनविरोध प्रक्रियेला दुजोरा दिला. त्यानुसार आज दुपारी महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या बरोबरच अन्य चौघांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या जागेवर आमदार अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना उमेदवार गौरव वाणी यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. कोणतीही निवडणूक बिनविरोध केल्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होणे टळते. हा चांगला पायंडा असल्याचे मत त्यांनी मांडले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भारतातील पहिलं पॉड हॉटेल सुरू झालय मुंबई सेंट्रलला | Pod Hotel Mumbai | Mumbai Travel Vlog

Back to top button