जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक | पुढारी

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

चाळीसगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना अटक करून जळगाव येथे हलविले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस खाऊ घ्यायला पाचशे रुपये देतो म्हणून दुचाकीवर बसवून करगाव रोडवरील पडीक घरात घेऊन गेले. तेथे दोन नराधमांनी त्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. २१) उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी शहरातील सुवर्णाताई नगर येथील दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाहीसाठी त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चाळीसगावकर हादरून गेले आहेत. पीडितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३६३, ३६६ (अ), ३५४ (अ), ३७६ (ड) व पोक्सो कायदा अंतर्गत कलम ४, ५(ग), ६, ८ प्रमाणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विष्णू आव्हाड हे करीत आहेत.

Back to top button