ध्वनिप्रदूषणात कोल्हापूर टॉपवर | पुढारी

ध्वनिप्रदूषणात कोल्हापूर टॉपवर

आल्याराज्यातील सर्वच शहरांमध्ये ध्वनिप्रदूषणात कमालीची वाढ झाली असून, कोल्हापूर व ठाणे यात आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या काळात ही नोंद करण्यात ने राज्यासाठी ध्वनिप्रदूषण चिंतेचा विषय बनण्याची शक्यता आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जाहीर केलेल्या अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दिवसाच्या ध्वनिप्रदूषणात कोल्हापूर, तर रात्रीच्या ध्वनिप्रदूषणात ठाणे शहर आघाडीवर आहे, तर नाशिक दोन्ही प्रकारांच्या टॉप 10 मध्ये आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने चालूवर्षी 21 व 22 फेब्रुवारीला राज्यातील 27 महापालिका क्षेत्रांत 102 ठिकाणी सतत 24 तास निरीक्षण केले. यासंबंधीचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला.

त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. दिवसाच्या ध्वनिप्रदूषणात कोल्हापूर आघाडीवर असल्याचे समोर आले असून, कोल्हापूरला दिवसा 80.7 डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे, तर रात्रीच्या ध्वनिप्रदूषणात ठाणे टॉपवर आहे. ठाण्यात रात्री 74.6 डेसिबलपर्यंतच्या आवाजाची नोंद करण्यात आली आहे

सर्वात कमी ध्वनिप्रदूषण असलेल्या शहरांमध्ये औरंगाबाद व लातूरची नोंद झाली आहे. औरंगाबादमध्ये दिवसा 47.3 डेसिबल इतक्या आवाजाची नोंद झाली आहे, तर लातूरमध्ये रात्री 44 डेसिबल इतक्या आवाजाची नोंद झाली असून, सर्वात कमी ध्वनिप्रदूषण करणारे शहर लातूर ठरले आहे. सुमारे 55 ते 60 डेसिबलपर्यंतचा आवाज हा साधारण समजला जातो, तर 140 डेसिबलपेक्षा अधिक आवाज मानवी स्वास्थ्यासाठी हानिकारक असतो.

दरम्यान, ज्यावेळी ध्वनिप्रदूषणाची ही नोंद करण्यात आली, त्यावेळी दिवाळी वा अन्य कुठलाही मोठा सण-उत्सव नव्हता. त्यामुळे फटाक्यांच्या आवाजाचा या प्रदूषणात संबंध नव्हता. अशातही ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने राज्यासाठी ही चिंतेची बाब असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून बोलले जात आहे.

 दिवसाच्या ध्वनिप्रदूषणातील आघाडीची दहा शहरे

कोल्हापूर, मुंबई, मीरा-भाईंदर, सोलापूर, पुणे, वसई-विरार, नाशिक, कल्याण, अमरावती, सांगली

 रात्रीच्या ध्वनिप्रदूषणातील आघाडीची दहा शहरे

ठाणे, भिवंडी, सोलापूर, मुंबई, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, मालेगाव, अमरावती, नवी मुंबई.

Back to top button