नाशिक : चांदवड तालुक्यात दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू | पुढारी

नाशिक : चांदवड तालुक्यात दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना चांदवड तालुक्यातील पाटे गावात बुधवारी घडली. या घटनेची माहिती कामगार पोलीस पाटील मच्छिंद्र रामचंद्र जाधव यांनी चांदवड पोलिसांना दिल्याने पोलिसात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाटे गावावर शोककळा पसरली आहे.

शेततळे पुर्ण भरल्याने बाहेर येण्यास अडथळा

पाटे येथील प्रगतशील शेतकरी संजय तळेकर यांचा मोठा मुलगा ओम (१३) व लहान मुलगा साईल अशी दोन मुले आहेत. हे बुधवारी (दि.१७) सकाळी बारा वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या नाल्याजवळ बकरी चारत होते.

यावेळी ते त्यांच्याच शेततळ्यातील पाण्यात पडले.

शेततळे पूर्ण पाण्याने भरले असल्याने त्यांचा शोध घेण्यात वेळ लागला.

जवळपास एक तासानंतर नागरिकांच्या मदतीने दोघांना पाण्यातून बाहेर काढीत त्यांना उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघेही मयत झाल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्या घरच्यांनी ओम अन साईलच्या नावाचा एकच टाहो फोडल्याने संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर सुन्न झाला होता.

संजय तळेकर यांना ओम व साईल हे दोघेच मुले असल्याने त्यांचा अशा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण पाटे गावातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.

Back to top button