jalgaon municipal : दोन आठवड्यांनी लागणार भाजप गटनेतेपदाचा निर्णय | पुढारी

jalgaon municipal : दोन आठवड्यांनी लागणार भाजप गटनेतेपदाचा निर्णय

जळगाव; पुढारी वृत्तसेवा; jalgaon municipal : महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्यानंतर फुटीर गटाने आपला गटनेता निवडला. पण माहितीचा अधिकारामध्ये वेगळीच माहिती समोर आली असून भाजपाचे गटनेते हे दुसऱ्याचे असल्याचे समोर आले. यामुळे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदाबाबत भगत बालाणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल दोन आठवड्यांनी लांबला आहे.

याबाबत वृत्त असे की, महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे गटनेते नेमके कोण? याबाबतचा वाद न्यायालयात पोहचला आहे. महानगरपालिकेत भाजपकडून भगत बालाणी तर बंडखोरांकडून ॲड. दिलीप पोकळे यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. दोन्ही गटनेत्यांनी आपणच अधिकृत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोणत्या गटनेत्याने सुचवलेले नाव स्थायी समितीसाठी ग्राह्य धरावे हा वाद सुरू आहे. हा या प्रकरणाची सुनावणी औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे.

गुजरातमध्ये १२० कोटींचे ड्रग्ज जप्त; द्वारका येथे पुन्हा कारवाई

याच खटल्याची बुधवारी सुनावणी झाली. महापालिकेच्या वतीने ॲड. विजय पाटील, ॲड. पोकळे यांच्या वतीने ॲड. पालोदकर तर महापौर जयश्री महाजन यांच्या वतीने ॲड. संदेश पाटील न्यायालयात याप्रसंगी उपस्थिती होते. न्यायमूर्ती गंगापूरकर यांच्या न्यायालयात गटनेतासंदर्भात अंतिम युक्तिवादासाठी दोन आठवड्यांची मुदत मागण्यात आली. न्यायालयानेदेखील मुदत देत पंधरा दिवसांनी कामकाज निश्चित केले. यामुळे आता भाजप गटनेतेपदाच्या वादाचा उलगडा हा दोन आठवड्यांनी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button