Child Pornography : चाईल्ड पोर्नोग्राफीचे धागेदोरे जळगाव, धुळेपर्यंत | पुढारी

Child Pornography : चाईल्ड पोर्नोग्राफीचे धागेदोरे जळगाव, धुळेपर्यंत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

Child Pornography Jalgaon Dhule : सीबीआयकडून मंगळवारी (दि.११) लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी देशातील १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ७६ ठिकाणी छापे टाकण्यात आहे. यात जळगाव, धुळ्यातही छापे मारण्यात आले आहेत. यामुळे या भयंकर प्रकाराचे धागेदोरे हे जळगाव धुळेपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले. अशी माहिती सीबीआयने जारी केलेल्या प्रेस नोट वरून स्पष्ट होत आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफीच्या विरूध्द सरकारने कठोर भूमिका घेतली असतानाही याचा सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने सीबीआयने मंगळवारी दिवसभरात देशभरात छापे टाकले.

Child Pornography : १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे

ऑनलाईन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (दि.१४) रोजी ८३ आरोपींविरुद्ध ऑनलाईन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर काल म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये दिली आहे.

सोशल मीडियातून आणि व्हॉटसऍप ग्रुप्सच्या माध्यमातून बाल लैंगिक शोषण व्हिडिओ व्हायरल

सीबीआयने केलेल्या तपासात आजवर सोशल मीडियातून आणि त्याही व्हॉटसऍप ग्रुप्सच्या माध्यमातून बाल लैंगिक शोषण साम्रग्रीला मोठ्या प्रमाणात शेअर करत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी त्यांना पैसे मिळत असल्याची माहिती देखील प्राथमिक तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी आता जळगावातून कुणावर नेमकी कारवाई करण्यात आली याची माहिती सीबीआयकडून लवकरच समोर येऊ शकते. तर याच प्रकरणी धुळ्यातही छापेमारी करण्यात आल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

सायबर पोर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणे यूपीमध्ये

२०२० च्या NCRB डेटानुसार, मुलांविरुद्ध सायबर पोर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणे उत्तर प्रदेशात १६१, महाराष्ट्रात १२३, कर्नाटक १२२ आणि केरळमध्ये १०१ नोंदली गेली आहेत. याशिवाय ओडिशामध्ये ७१, तामिळनाडूमध्ये २८, आसाममध्ये २१, मध्य प्रदेशात २०, हिमाचल प्रदेशमध्ये १७, हरियाणामध्ये १६, आंध्र प्रदेशमध्ये १५, पंजाबमध्ये ८, राजस्थानमध्ये ६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Back to top button