लासलगाव : गोदावरी नदीपात्रात वऱ्हाड घेऊन जाणारा पिकअप पडला | पुढारी

लासलगाव : गोदावरी नदीपात्रात वऱ्हाड घेऊन जाणारा पिकअप पडला

लासलगाव; पुढारी वृत्तसेवा : वऱ्हाड घेऊन जाणारा पिकअप गोदावरी नदीपात्रात पडल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ८ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत सायखेडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येवला येथील उत्तम घुले यांचा मुलगा योगेश याच्या विवाहासाठी सिन्नर येथे ( दि १३ ) मंगळवारी वऱ्हाड गेले होते. विवाह सोहळा झाल्यानंतर ते निफाड – सिन्नर मार्गाने निघाले होते.

अधिक वाचा : 

गोदावरी
गोदावरी नदीत पडलेला पिकअप बाहेर काढण्याचा प्रयत्न

गोदावरी नदीवर दुपारी सव्वा दोन वाजेच्या दरम्यान समोरून वाहन आल्यामुळे पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पिकअप नदीत कोसळून ही दुर्दैवी घटना घडली.

नदीमध्ये पिकअप कोसळल्याचे दिसताच जवळच मासेमारी करणाऱ्या विशाल मोरे याने नदीत उडी घेत यातील १५ लोकांना बाहेर काढले. त्याला रमजू शेख आणि सोमनाथ कुऱ्हाडे यांनीही मदत केली.

घटनास्थळी नांदूर मध्यमेश्वर येथील पोलीस पाटील गोरक्षनाथ वाघ, खाणगाव येथील पोलीस पाटील दौंड, विजय डांगले यांच्यासह ग्रामस्थही पोहचले. त्यांनी लगेचच मदत कार्य सुरु केले. त्यांनी जखमीना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

अधिक वाचा : 

या दुर्दैवी घटनेत सई विकास देवकर (वय ५), मधुकर घुले (५५) या दोघांचा मृत्यू झाला. सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ करीत आहे.

हेही वाचले का?

पाहा अॅश्ले बार्टीचे फोटोज्

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

 

 

Back to top button