चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शेतात झाडाखाली पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीला नागाने दंश केल्याने उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
चांदवड-मनमाड रोडवरील म्हसोबा चौकी परिसरात राहत असलेले विवेक मोरे (वय ४६) यांची मुलगी प्राची (वय १२) रविवारी (दि.२७) आईसोबत शेतात गेली होती. यावेळी ती झाडाखाली पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी गेली असता तेथे असलेल्या नागाने तिच्या उजव्या हाताच्या बोटाला दंश केला. तिने ही घटना तत्काळ आई-वडिलांना सांगताच तिला उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिच्यावर प्राथमिक उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
तिच्या मृत्यूनंतर मोरे कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे रुग्णालयाचा परिसर सुन्न झाला होता. मृत प्राचीच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजोबा, आजी, काका, काकू असा परिवार आहे.
हेही वाचा :