नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी संशयितांविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करत शहर पोलिसांनी १४ पैकी १३ गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने मंगळवार (दि. १)पर्यंत पाेलिस कोठडी सुनावली आहे.
सिडकोतील बाजीप्रभू चौकात राकेश कोष्टीवर गोळीबार करून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्चस्ववादातील या प्रकारात सराईत गुन्हेगारांचा समावेश होता. शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील १४ जणांवर मोक्कानुसार कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. दरम्यान, गोळीबार प्रकरणातील काही संशयितांचा समावेश पंचवटीतील सुनील वाघ खून प्रकरणात होता व त्यांना शिक्षा लागल्याने ते मध्यवर्ती कारागृहात होते. मोक्काचा तपास करण्यासाठी शहर पोलिसांनी १४ पैकी १३ संशयितांची धरपकड केली. त्यांना विशेष न्यायालयात हजर केले असता, सरकारी पक्षातर्फे ॲड. सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला. पोलिसांना तपासासाठी संशयितांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी संशयितांना मंगळवार (दि. १) पर्यंत पाेलिस कोठडी सुनावली आहे.
अटक केलेले संशयित
विकी के. ठाकूर (२८), गौरव संजय गांगुर्डे (३२, रा. नवनाथनगर, पंचवटी), किरण ज्ञानेश्वर क्षीरसागर (२९, रा. जानोरकर वाडा, पंचवटी), किरण दत्तू शेळके (२९, रा. अंबिका चौक, पंचवटी), सचिन पोपट लेवे (२३, रा. क्रांतिनगर, पंचवटी), राहुल अजयकुमार गुप्ता (२८, रा. नाटकर लेन, पंचवटी), किशोर बाबूराव वाकोडे (२२, रा. कथडा, जुने नाशिक), अविनाश गुलाब रणदिवे (२६, रा. शिवाजीनगर, सातपूर), श्रीजय संजय खाडे (२३, रा. कृष्णनगर, जुना आडगाव नाका, पंचवटी), जनार्दन खंडू बोडके (२२, रा. काळाराम मंदिराजवळ, पंचवटी), सागर कचरू पवार (२८, रा. गणेशवाडी, पंचवटी), पवन दत्तात्रेय पुजारी (२३, रा. तारवालानगर, पंचवटी), महेंद्र उर्फ गणपत राजेश शिरसाठ (२८, रा. दत्त चौक, विजयनगर) अशी पोलिस काेठडी सुनावलेल्या संशयितांची नावे आहेत.
हेही वाचा :