नाशिक क्राईम : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार - पुढारी

नाशिक क्राईम : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

कळवण; पुढारी वृत्तसेवा: आडगाव (नाशिक क्राईम ) येथील २५ वर्षीय तरुणीस एकाने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करून अत्याचार केला. दोघेजण एकाच कंपनीमध्ये कामाला असल्याने त्याच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, विवाह करण्यासाठी तरूण तयार नसल्याने त्याच्यावर बलात्काराचा व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कळवण ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निफाड तालुक्यातील जऊळके वणी येथील तरूण योगेश चौरे याने पीडित तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी कळवण तालुक्यातील नांदुरी, वणी गडावरील भगवती लॉजवर शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केला. ही घटना सन २०१८ पासून ते दि. ९ ऑक्टोंबर २०२१ रोजी पर्यंत करण्यात आल्याने या काळात संबंधित तरूणी प्रेंग्नट झाली.

त्यामुळे पीडित तरुणीने योगेशकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. परतुं, योगेशने लग्नास टाळाटाळ करीत युवतीला न सांगता गर्भपाताच्या गोळ्या देऊन युवतीचा गर्भपात केला. यामुळे योगेशविरोधात भादवी कलम ३७६, ४२० अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम कलम ३ (१) (डब्लू ) (१) (२) ३ (२) (५) अन्वये कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहेत.

या घटनेमुळे (नाशिक क्राईम ) तालुक्यातील खाजगी लॉज मालक नियमांची पायमल्ली करीत कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आशेने युगलांना रूम उपलब्ध करून देत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असा संताप नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाने जागरूक राहून लॉजची वेळोवेळी तपासणी करावी, नांदुरी ऑउटपोस्टवर पोलीस तैनात असताना मुले, मुली वाहनाने गडावर जातात यांची चौकशी करावी. त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असेही नागरिकांतून मागणी होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button