जळगाव : इन्शुरन्सच्या नावाखाली ६१ लाखांची ऑनलाईन फसवणूक - पुढारी

जळगाव : इन्शुरन्सच्या नावाखाली ६१ लाखांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: शहरातील ८८ वर्षीय वृध्दाला इन्शुरन्समध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून ६१ लाख ७९ हजार रूपयांची ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील विद्यूत कॉलनी परिसरात एक ८८ वृध्द व्यक्ती हे आपल्या कुटुंबियासह राहतात. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर दिपीका शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने संपर्क साधला.

यानंतर दिपीकाने आपण स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले.

याशिवाय त्या व्यक्तीस स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे नाव व लोगो असलेले बनावट कागदपत्रे तयार करून खरे असल्याचे भासविले. याशंतर दिपीका शर्मा, अनुराग शर्मा आणि कमलाकरण रेड्डी असे नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी त्याच्याकडून वेळावेळी पैशांची मागणी करत सुमारे ६१ लाख ७९ हजार ५९३ रूपये गुंतवणूक केल्याच्या नावाखाली उकळले.

यानंतर त्या व्यक्तीने काही काळानंतर जास्त पैशाची मागणी केली. परंतु, दिपीका शर्मा, अनुराग शर्मा आणि कमलाकरण रेड्डी या तिघांनी परत त्यांना पैसे दिले नाहीत. या घटनेनंतर व्यक्तीला आपली ऑनलाईन फसवणूक ( ऑनलाईन गंडा ) झाल्याचे समजले.

याप्रकरणी वृध्द व्यक्तीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button