भुसावळात नराधम बापाकडून मुलीवर अत्याचार | पुढारी

भुसावळात नराधम बापाकडून मुलीवर अत्याचार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

भुसावळ शहरातील एका भागात राहणा-या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सख्या बापाने गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी नराधम बापाला अटक केली असून भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजार पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपला आई-वडिलांसह राहते. दरम्यान पीडित मुलीला तीचे सख्खे ४१ वर्षीय वडीलांकडून जीवे ठार मारण्याची धमकी देवून गेल्या तीन वर्षांपासून ते 23 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या राहत्या घरात जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात नराधम बापाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहे.

हेही वाचलत का?

 

Back to top button