राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार : गुलाबरावांचे वक्तव्य

राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार : गुलाबरावांचे वक्तव्य
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्याकरिता केलेली आहे. हिंदुत्वाकरिता केलेली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकतो हे कधीच होणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

संजय राऊतसारखे कंडक्टर भेटले अन्…

उद्धव ठाकरेंना आम्ही यापूर्वी सावध केले होते की पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल. जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे. रस्ता चुकीचा दिसतोय. मात्र, गाडीतले संजय राऊतसारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news