वणी; पुढारी वृत्तसेवा : जोपुळ आश्रम शाळेतील संकेत गालट मृत्यु प्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोपूळ (ता. दिंडोरी) येथील यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित आश्रमशाळेतील ही घटना घडली होती. इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला.
जोपूळ (ता. दिंडोरी) येथील यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी संकेत ज्ञानेश्वर गालट (११, रा. सावर्णा, ता. पेठ) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच गालट याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांसह संस्थेची मान्यता रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी किरकोळ खोकला व घसा दुखत असल्याने त्यास तेथील शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खेडगाव या ठिकाणी उपचाराकरीता नेले होते. उपचारासाठी हलगर्जीपणा केल्याचा आरोप संकेतच्या पालकांनी ज्ञानेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पालकांच्या फिर्यादीनुसार वणी पोलीसांनी साखरे संध्या भास्कर (मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रमशाळा जोपुळ ता. दिंडोरी) गुळवे भरत रमाकांत (वर्गशिक्षक, प्राथमिक आश्रमशाळा जोपुळ ता. दिंडोरी) भामरे एकनाथ दाजी (अधिक्षक, प्राथमिक आश्रमशाळा जोपूळ ता. दिंडोरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत.