नाशिक : अजित सुराणा यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर | पुढारी

नाशिक : अजित सुराणा यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा

श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अजित सुराणा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा जीवनसाधना पुरस्कार हा जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात ७४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने सन्मानाने प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, प्रतिभावंत संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, समाजसेवक व उद्योगपती सायरन पुनावाला, उद्योगपती बेबीलाल संचेती, पोपटराव पवार, साहित्यिक गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, ज्येष्ठ साहित्यिक द मा .मिरासदार, अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव तसेच ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथा आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आले आहे.

श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती यांना देखील यापूर्वी हा पुरस्कार विद्यापीठाने दिलेला असल्याने विद्यापीठाच्या इतिहासात एकाच संस्थेच्या दोन मान्यवरांना गौरविले. त्यामुळे संस्थेची प्रतिमा उंचावली आहे. त्यांच्या गौरवशाली पुरस्काराबद्दल विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष अरविंद भनसाळी, विश्वस्त मंडळाचे आणि प्रबंध समितीचे सर्व सदस्य, प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य व प्राध्यापक आणि कार्यालयीन वृंद यांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा:

Back to top button