नाशिक : अपह्त डिलीव्हरी बॉयसाठी पोलिस पथकांची शोधमोहिम | पुढारी

नाशिक : अपह्त डिलीव्हरी बॉयसाठी पोलिस पथकांची शोधमोहिम

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

युवकाने व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड केली नाही म्हणून पळवून नेत त्याच्याकडे वीस लाखाची मागणी केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दोघा अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर पाटील व यशवंत बागुल यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी आज येथे दिली. पोलिसांनी अपहरणकर्त्यांना शोधण्यासाठी पथके तयार केली आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी – प्रमिला जगन्नाथ पाटील (आनंद प्रेमशिल्प अपार्टमेंट, बोधले नगर) यांचा मुलगा संदीप हा स्विगीची डिलिव्हरीचे काम करतो. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास संदीप नाशिक रोड परिसरात डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकीवर गेला होता. त्याचवेळी संदीपने आईला फोन करून सांगितले की, वीस लाख रुपये जमा करून ठेव, हे लोक प्रॉपर्टी नावावर करून मागत आहेत. मला घेऊन चालले आहेत, असे सांगून संदिपने फोन बंद केला.

खान्देशात २०२१ मध्ये संदीप हा जमीन खरेदी-विक्रीचे काम करत असताना काही जणांकडून त्याने व्याजाने पैसे घेतले होते. त्याची परतफेड केली नाही म्हणून संबंधित लोक आजपर्यंत त्रास देत आहेत. त्यांच्या जाचाला कंटाळून दीड वर्षांपूर्वी धुळ्याहून पाटील कुटूंब नाशिकला राहण्यास आलो. पैशासाठी जुलै २०१९ मध्ये सर्व कुटुंबाला पंधरा दिवस घरात डांबून ठेवले होते. २३ जुलै २०१९ रोजी धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला होता. तसेच प्रमिला पाटील यांच्या कुटुंबियांनी यशवंत बागुल व त्यांच्या बारा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

बोधलेनगरच्या मेट्रो मॉलमागे ते राहत असलेल्या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील, यशवंत बागुल यांनी काही दिवसापूर्वी वॉचमनला पाटील कुटुंबियांचे फोटो दाखविले. हे कुटुंबीय कुठे जाते, याबाबत चौकशी केली होती. ज्ञानेश्वर पाटील व यशवंत बागुल यांनी संदीपला पळवून नेत वीस लाखाची मागणी केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button