नाशिक : धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; चौघे गजाआड, एक फऱार | पुढारी

नाशिक : धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; चौघे गजाआड, एक फऱार

नाशिक, सिन्नर : पुढारी वृत्तसेवा 

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पाथरवट समाजातील महिलेला धर्मांतराचे आमिष दाखवून गुलाबी रंगाचे गुंगीचे पाणी पाजून सामूहिक बलात्कार करून मारहाण केल्याची घटना शहरातील वैदूवाडीत शनिवारी (दि. ४) उघडकीस आली. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुळ रायतेवाडी, ता. संगमनेर जि.अहमदनगर येथील पाथरवट समाजाची महिला माळेगाव परिसरातील दावत मळा येथे सुमारे २ ते ३ वर्षांपासून पती, मुलगी व दोन मुलांसह वास्तव्यास आहे. ३० नोव्हेंबरला पीडित महिला मुसळगाव एमआयडीसीमध्ये काम शोधण्यासाठी घरून निघाली होती. दुपारच्या सुमारास वावी वेस येथे आल्यानंतर रिक्षाची वाट पाहात असताना तेथे तिला दोन महिला भेटल्या त्यांनी, तू कोठे चाललीस? अशी विचारणा केली. त्यावेळी पीडित महिलेने त्यांना काम शोधण्यासाठी मुसळगाव येथे चालले असल्याचे सांगितले होते. त्यांनी काम देण्याच्या आशेवर तिला हनुमान मंदिर, जोशीवाडी सिन्नर येथे आणले. तेथे गुंगीचे औषध पाजत पुढील दोन दिवस दोघा-तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी पीडित महिलेचा पती तिला शोधत वैदूवाडीत आला असता, पीडितेच्या पतीला दमदाटी करून हुसकून दिले व तिच्या लहान मुलाला बळजबरीने ठेवून घेतले. दि. २९ डिसेंबर रोजी पीडितेचा पती हे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यासोबत तेथे गेला व पीडितेची सुटका केली. पीडित महिला व तिचे पती यांनी संगमनेर येथील महिला सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेतली व आपबिती कथन केली.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून या पाचही संशियितांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धर्मांतराच्या नावाखाली महिलेला बळजबरीने घरात डांबून ठेवून तिच्यावर महिनाभर अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर सिन्नर पोलिसांनी तातडीने याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.

पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह सिन्नर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या चौघांना रविवारी (दि. ५) सकाळी दिवस उजडताच ताब्यात घेतले. भाऊसाहेब उर्फ भावड्या यादव दोडके (३५. रा. जोशीवाडी), कथित फादर राहुल लक्ष्मण आरणे (४५, रा. गौतमनगर, सिन्नर), रेणुका उर्फ बुटी यादव दोडके (२९, रा. जोशीवाडी) व प्रेरणा साळवे (२५, रा. द्वारका. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा :

Back to top button