नाशिक : ठरलं तर उद्या संपावर जायचं; माथाडी कामगारांचा निर्धार | पुढारी

नाशिक : ठरलं तर उद्या संपावर जायचं; माथाडी कामगारांचा निर्धार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्यांकडे माथाडी कामगारांचे विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी बुधवारी (दि.1) लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी पुकारलेल्या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगार सहभागी होणार आहेत.

माथाडी कामगारांच्या लाक्षणिक संपाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (दि.30) महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या द्वारका येथील कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लाक्षणिक बंद यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या, मालधक्के, शासकीय धान्य गोदाम व विविध आस्थापनांमधील हजारो माथाडी कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन युनियनचे जिल्हा चिटणीस सुनील यादव व कृष्णराव जगदाळे यांनी केले. यावेळी नारायण पोटे, रमेश पालवे, साहेबराव देवरे, संदीप साळे, रमेश जाधव, अनिल सोनवणे, विठ्ठल कुटे, नाना खरे, कैलास भालेराव, उज्ज्वल गुजराथी, उत्तम खांदे, श्रीराम जाधव, धनराज उगले, विश्वास सोनवणे, दत्ता पगारे, नामदेव काकवीपुरे, सोमनाथ लभडे, भानुदास घोलप, भाऊसाहेब गोसावी, नाना नेहे, ताराचंद खैरनार, अनिल जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button