नाशिक : देवळालीत अत्याधुनिक तोफा अन् रॉकेट लॉन्चरचा थरार | पुढारी

नाशिक : देवळालीत अत्याधुनिक तोफा अन् रॉकेट लॉन्चरचा थरार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

भारतीय लष्कराचे तळ असलेल्या देवळालीत अत्याधुनिक तोफा तसेच रॉकेट लॉन्चरचा थरार पाहायला मिळाला. अवघ्या काही सेकंदात उंच डोंगरावर असलेले लक्ष भेदणारे तोफगोळे व रॉकेट पाहून भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची दर्शन घडले.

देवळालीच्या फील्ड फायरिंग रेंज येथे स्कूल ऑफ आर्टिलरीद्वारे रविवारी ( दि. २९ ) भारतीय तोफखान्याचे वार्षिक फायर पॉवर प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण व्यायाम युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला. यात अत्याधुनिक तोफा व रॉकेट लॉन्चरच्या साहसी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले.. लेफ्टनंट जनरल एस. जनरल हरी मोहन अय्यर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रमुख उपस्थितीत प्रात्यक्षिके झाली. यावेळी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन, डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स, पुणे येथील विद्यार्थी अधिकारी आणि नेपाळ आर्मी कमांड अँड स्टाफ कॉलेजचे अधिकारी आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रात्यक्षिकाचे वैशिष्टे असे…
गोळीबार आणि पाळत ठेवणे आणि लक्ष्य संपादन करणे, तोफखान्यात सर्व एकत्रीत राहुन तोफ, मोर्टार, रॉकेट, ड्रोन, विमानचालन अशा विविध उपकरणांच्या संपर्काने शत्रु वर हल्ला चढविने. असे मुख्य आकर्षण प्रात्यक्षिकाचे होते.

तोफखान्याची अत्याधुनिक साधनसामग्री…
स्वदेशी विकसित K-9 वज्र, धनुष, भारतीय फील्ड गन ,लाइट फील्ड गन सिस्टीम आणि ‘आत्मनिर्भर भारत’ द्वारे प्रेरित पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर ही मुख्यतः तोफखान्याची खास शस्त्रे आहेत. ही शस्त्रे अचूकतेने लक्ष्यावर मारा करण्यासाठी ओळखली जातात, तोफखानाच्या रेजिमेंटच्या तोफखान्यातील अदम्य इच्छाशक्ती, कार्यक्षमता आणि तत्परता दर्शवते .

डोंगरावर तोफगोळे अन् रॉकेटचा मारा 
प्रात्यक्षिक सादर करतेवेळी साधारण सात , नऊ व अकरा किमी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील टार्गेट निश्चित करण्यात आले .तोफखान्यातील अत्याधुनिक तोफां व रॉकेट लॉन्चरने या लक्षावर मारा करण्यात आला. या तोफा व रॉकेट लॉन्चर ची रेंज ही पन्नास ते सत्तर किमी अंतर येवढी आहे. स्वदेशी बनावटीच्या K-9 वज्र, धनुष, भारतीय फील्ड गन ,लाइट फील्ड गन सिस्टीम, बोफर्स , चुणूक हेलिकॉप्टर आदीं शास्त्रांचा वापर प्रात्यक्षिकात केला गेला.

हेही वाचा:

Back to top button