नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयाला उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार जाहीर | पुढारी

नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयाला उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार जाहीर

नाशिक (देवळाली कॅम्प) :  पुढारी वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा यंदाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयास जाहीर झाला आहे. वितरण सोहळा सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्थापणेच्या दिवशी शुक्रवारी (दि. १०) फेब्रुवारी रोजी पुणे येथे हाईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण महाविद्यालयांना दिला जातो. श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाची शहरी विभागातून पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामकाज केल्यामुळे देवळाली कॅम्प येथील महाविद्यालयास हा पुरस्कार जाहीर झाला. पुरस्काराबददल मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे आदी कार्यकारणी सदस्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबददल संस्थेच्या पदाधिकारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा:

Back to top button