नाशिक : सात कर्जदारांनी मिळून बॅंकेलाच घातला ५४ लाख रुपयांचा गंडा | पुढारी

नाशिक : सात कर्जदारांनी मिळून बॅंकेलाच घातला ५४ लाख रुपयांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बँकेचा अधिकृत एजंट व इतर सात कर्जदारांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे सादर करीत बँकेकडून कर्ज घेत सुमारे ५४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बँकेचे अधिकाऱ्यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात फसवणूक, अपहाराची फिर्याद दाखल केली आहे.

प्रमोदकुमार ओमकारेश्वर अमेटा (४३, रा. कांदिवली, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी २ मार्च ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हा गंडा घातला आहे. मायको सर्कल येथील आय. डी. एफ. सी. फर्स्ट बँकेच्या शाखेत योगेश नाना पाटील (२७, रा. तळवाडेरोड, चांदवड) हा बँकेचा अधिकृत एजंट होता. त्याने मार्च ते नोव्हेंबर दरम्यान, बँकेचे कर्जदार ग्राहकांसोबत संगनमत करून बनावट बँक स्टेटमेंट तयार केले. बनावट स्टेटमेंट बँकेस सादर करीत कर्जदार ग्राहकांनी कर्ज प्रकरण मंजूर करून घेत बँकेकडून ५४ लाख सहा हजार ८६२ रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी कर्जाच्या पैशांचा अपहार करीत कर्ज परतफेड केली नाही. याप्रकरणी योगेश पाटील यांच्यासह गणेश फकीरा सांगळे, सुर्यकांत पंढरीनाथ वाघुळे, ताई पांडुरंग पगारे, योगेश सुकदेव काकड, सुरेखा सुकदेव गायकवाड, नंदु देवराम काळे, स्वाती प्रविण शिरसाठ या कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्जदारांनी प्रत्येकी ७ ते ९ लाख रुपयांचे कर्ज घेत बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

कर्जदारांनी घेतले कर्ज

कर्जदाराचे नाव : कर्जाची रक्कम

गणेश सांगळे : ७,०४,२८२

सूर्यकांत वाघुळे : ८,०७,४७८

ताई पगारे : ७,२७,३८६

याेगेश काकड: ६,९१,७८७

सुरेखा गायकवाड : ७,७५,४०७

नंदू काळे : ९,०९,३४१

स्वाती शिरसाठ : ७,९१,१८१

हेही वाचा : 

Back to top button