गणेश जयंती : सिद्धिविनायक महागणपतीसाठी साठ हजार भाविकांच्या गुगलवर भेटी | पुढारी

गणेश जयंती : सिद्धिविनायक महागणपतीसाठी साठ हजार भाविकांच्या गुगलवर भेटी

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील पाडळी फाट्यापासून जवळच असणार्‍या जानोरी रोडवरील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे गणेश जयंतीनिमित्ताने बुधवारी (दि. 25) गणेश जयंती उत्सव सोहळा व यात्रा महोत्सव आयोजित केल्याचे प्रतिष्ठानचे विश्वस्त संजय तुपसाखरे यांनी सांगितले. बुधवारी सकाळी 6 पासून महागणेशयाग, महायज्ञ व महापूजा तसेच दुपारी 1 वाजता श्रींची पाडळी देशमुख गावातून सवाद्य मिरवणूक व पालखी सोहळा होणार आहे. दुपारी 12 नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 ते 8 पर्यंत गणेश भक्तांसाठी भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री आठ वाजता श्रींची महाआरती होणार आहे. भाविकांनी यात्रामहोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने संयोजकांनी केले आहे.

गुगलवर 60 हजार भाविकांनी भेटी
श्री सिद्धिविनायक मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले असून, गणेशोत्सव किंवा गणेशजयंती जवळ आल्यापासून याठिकाणी यात्रेचे स्वरूप येते. गुगल मॅपवरही देशभरातील सुमारे 60 हजारांवर भाविकांनी भेटी दिल्या आहेत.

हेही वाचा:

Back to top button