नाशिक : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू

नाशिक : क्रिकेट खेळताना ३२ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) कॉलेज रोड परिसरात घडली. आकाश रवींद्र वाटेकर (३२, रा. राणेनगर) असे या युवकाचे नाव आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा मंगळवारी सायंकाळी एनबीटी लॉ महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळत असताना त्यास अस्वस्थ वाटले. त्यामुळे त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी आकाशला तपासून मृत घोषित केले. या घटनेने सहकाऱ्यांना धक्का बसला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश हा विधी शाखेच्या अखेरच्या वर्षात शिकत होता.

हेही वाचा : 

Back to top button