नाशिक : शहरातील ‘या’ भागांतील पाणीपुरवठा उद्या बंद | पुढारी

नाशिक : शहरातील 'या' भागांतील पाणीपुरवठा उद्या बंद

नाशिक : सातपूर विभागात ५०० मिमी व्यासाच्या पीएससी ग्रॅव्हिटी मेन पाइपलाइन पाणीगळती दुरुस्ती आणि जीपीओ जलकुंभ येथे ४५० मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बसविण्याचे काम होणार आहे. त्यासाठी बुधवारी (दि. २५) सातपूर, जुने नाशिक तसेच पश्चिम नाशिक विभागामधील काही भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधील डावा तट कालवा, आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक पाइपलाइन रोड येथे ५०० मिमी व्यासाच्या पीएससी ग्रॅव्हिटी मेन पाइपलाइनला पाणीगळती सुरू झालेली आहे. पाइपलाइन ही शुद्ध पाण्याची आहे. त्यावरून सातपूर प्रभाग ८ व नाशिक पश्चिममधील प्रभाग ७ रामराज्य, नहुष जलकुंभ भरून वितरण क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यात येतो. नाशिक पश्चिम विभागातील जीपीओ जलकुंभ, बुधवार पेठ जलकुंभ व सादिकशहा जलकुंभ भरणाऱ्या लाइनवर ४५० मिमी व्यासाचे व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या जलकुंभावरून नाशिक पश्चिम प्रभाग क्र. १३ (भागशः) व प्रभाग क्र. १४ (भागशः)मध्ये पाणी वितरण होते. याठिकाणी बुधवारी (दि.२५) सकाळचा पाणीपुरवठा झाल्यानंतर पाइपलाइन गळती दुरुस्ती करणे व व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शटडाउन आवश्यक आहे. त्यामुळे बुधवार, दि. २५ रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि मनपास सहकार्य करावे.

शटडाउनमुळे प्रभाग क्र. १३, प्र. क्र. १४, प्र. क्र. ८ रामराज्य जलकुंभ-सावरकरनगर, रामनगर, नरसिंहनगर, मते नर्सरी रोड, दातेनगर, आसारामबापू पूल परिसर व इतर परिसर, प्र. क्र. ७ नहुष जलकुंभ, डीकेनगर, सहदेवनगर आयाचितनगर, सुयोजित गार्डन, गंगासागर कॉलनी, पंपिंग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर, शांतिनिकेतन कॉलनी, १२ पंपिंग स्टेशन, चैतन्यनगर इत्यादी परिसर सिद्धिविनायक कॉलनी भद्रकाली, साेमवार पेठ, चव्हाटा, बुधवार पेठ, बडी दर्गा परिसर, कुंभारवाडा, जुने नाशिक परिसर, सारडा सर्कल परिसर, अमरधाम रोड या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

हेही वाचा : 

Back to top button